Friday, November 30, 2007

प्रमोद नवलकरांना श्रद्धांजलि

प्रमोद नवलकर गेले.ज्या लोकानी शिवसेनेच्या स्थापनेपासून तिची सेवा केली ,अणि ती मोठी केली त्यातलेच एक नेते म्हणजे नवलकर!
आज सगाळिकडे राजकारण म्हणजे गुंड अणि पैश्याचा माज असणाया लोकांचा खेळ झाला असतानाही त्यात सुसंस्कृत अश्या काही मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे नवलकर.मराठी माणसांसाठी मनापासून झटणारया आद्य शिवासैनिकांचे नवलकर हे एक प्रतिनिधि होते.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या वाटचालित मनोहर जोशी,सुधीर जोशी,दत्ताजी नलावडे ह्यान्सारखे सुसंस्कृत आणि तळमळीने लोकोपयोगी काम
करणारे जे नेते शिवसेनेला लाभले त्यामधे हया भटक्याचे एक विशेष स्थान होते. राजकारण म्हणजे येन केन प्रकार सत्ता मिळवुन
त्याला चिकटून बसणे , आणि वाट्टेल त्या तड़जोडी करून खुर्चिला चिकटून बसणे हाच आज धंदा झाला आहे।केवळ आपले सरकार टिकून रहावे म्हणुन वाट्टेल त्याच्या पुढे गुधागे टेकून देशाला खडडयात घालणारे लोक आज खुर्च्या उबवत बसले असताना नवलाकरान्सार्ख्या परखड आणि तत्वनिष्ट राजकारण्यांची सर्वात जास्त गरज देशाला आहे।


असेच नवलकर पुन्हा जन्माला येवोत आणि नाठाळान्च्या डोक्यात काठी घालोत हीच देवाकडे प्रार्थना!



No comments: